Friday, 16 January 2015


About Us






A Speech By  आमचे अध्यक्ष 
स्वराज्य सेवा संघ हि एक महाराष्ट्र राज्य स्तरावर काम करणारी मराठी युवकांची संघटना आहे. जो जन्मानेमनाने मराठी आहे तो आमाला जॉईन करू शकतो. महाराष्ट्र राज्य भरlत संघटनेचे १३,००० च्या वरती कार्यकर्ते आहेत. संघटनेत सर्व जाती धर्माच्या लोकांना समान दर्जा दिला जातो. कुणी मला सांगेल का  हो संघटना म्हजे असता काय?
संघटना म्हणजे असतो सामाजिक, आर्थिकवैचारिक  विकास.
पण याचा आता  आम्हाला आता पुरता विसर पडलायआमची एकी तेवडी भांडणातगणपतीत दंग करण्यात दिसून येते पण आमची एकी जेवा विकासाची वेळ येते तेवा जाते कुठे होविचार करण्या जोगी गोष्ट आहे, इंग्रजांसारख्या विश्व विजेत्यांना देखील  पाणी पाजलेले कधीच्या कालचे शूरवीर मावळे आम्ही आता आम्ह्च्याच भूमीत लाचारीच जगणं जगतोय,
का?
कशाशाठी?
कशामुळे
या गोष्टींचा पुरेपूर विचार होणं गरजेच आहे मित्रानो  नाहीतर जसा जंगलात वनवा लागतो तो पसरत जातो नि शेवटी विझून जातो तसच होईल मराठी माणसाचं! आणि राजे म्हणलेत राजे येतील नि जातील पण स्वराज्य मात्र टिकला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो शिवाजी जन्माला यावा शिवाजी जन्माला यावा अरे पण मावळ्यान शिवाय शिवाजी करणार तरी कायम्हणून आपल्याला आपल्यात प्रथमता एक मावळा निर्माण केला पाहिजे तेव्हा मग अभिमानान जय भवानी म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे. आपल्याला नेहमी वाटत कि समाज सुधारणा व्हावी, महागाई वाढलीये मराठी माणूस पार पिळून पिळून घेतला जातोय त्याला यातून सोडविला कुणीतरी यावपण सगळेच असा म्हणाले तर हे सगळे कुणी करावदेवावर माझा पूर्ण विश्वास आहे
भगवत गीतेत श्री कृष्णान सांगितलाय जेव्हा जेव्हाधर्मावर अधर्माच वर्चस्व वाढत  तेव्हा तेव्हा श्री कृष्णाचा जन्म होतोपण मित्रानो मग म्हणून  काय आपण नुसतं हातावर हाथ देऊन निवांत बसाईचं? अफजल खान जेव्हा स्वराज्यावर  चालून आला तेव्हा राजे स्वत त्याला सामोरे गेल्ते देवापुढ त्यची वाट बघत नव्हते बसले. म्हणून सुरवात आपण आपल्या कडून करूयातएक चांगला माणूसएक चांगला मावळा बनुयात. जगाला दाखवून देऊयात  कि आमी पण कुणाला कमी नाही कारण अजूनही सळसळतय मर्द मराठयांच रक्त,  आम्ही फक्त आणि फक्त शिवाचेच भक्त’. म्हणून तर संघटनेला बोधवाक्य दिलाय उभरत्या रक्ताची उभारती संघटना’, आज  आम्ही असू कदचीत थोडी लहान संघटना पण नक्कीच एक दिवस आमच्या मनातली क्रांतीची आग एक न एक दिवस इथल्या प्रत्येकाच्या मनlत जागंउ . इत्तिहास नेहमीच म्हणत आलाय वेडात मराठे वीर दौडले सातपुन्हा एकदा स्वराज्याची सेना तयार आहे स्वराज्याच्या वेडात दौडयला  फक्त आता बघैचय या वेळी किती वीर दौडतायेतआमच्या सोबत यून लढतीत का समोर खिंड पावन होताना दिसत असतानाही बघ्यांच्या गर्दीत बघत बसतात. मी आवाहन करतो आपल्या सर्वाना कि आपण याव आणि बनव ताकद स्वराज्याची, आपल्या वेळेनुसार जस जमेल तसं समाज कार्य  कराव आणि स्वर्गात बसलेल्या आमच्या राजाला समाधान वाटेल असा काहीतरी करावराजlनीही आपला सिहासन सोडव आणि उठून म्हणावं ते बघ मराठ्याच पोरमाझ पोर रक्ताच्या थारोळ्यात  पडलाय पण लढतायएकटच लढतययाला म्हणतात सच्चा मराठा’. आणि खरच  विश्वास ठेवा एक दिवस असा आणूच. या सर्व गोष्टी तसेच मराठी लोकांची सद्य परीस्तीती पाहून संघटनेने आपली उद्दिष्टे ठरवली आहेत.   


1)      हिंदू-मुस्लीम-बौद्ध हे जे सर्व मतभेद आमच्यात आहेत ते मिटविण्यासाठी कार्य करणेकारण आता इथून पुढे एका दिव्यात एकाच वातमराठी आम्ही आमची मराठी जात
2)      खरा इतिहास लोकांपर्यंत पोचविणे.
3)      गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे.
4)      अनाथ आणि वृद्धाश्रम चालविणे.
5)      शिक्षण संस्था चालविणे.
6)      बेरोजगारी निर्मुलन (अल्पशिक्षित ते उच्चशिक्षित सर्वाना आम्ही नोकरी देतो).
7)      वृक्षपक्षीमृदा संधार्नासाठी वेग्वेग्ल्ये प्रकल्प राबविणे.
8)      शेतकर्याना आधुनिक शेतीची माहिती देणेवेगवेगळ्या कृषी विद्यापीठांशी सलग्न होऊन शेतकर्यांना  शेतीविषयक माहिती पुरविणेत्यांना शेती साठी अर्थ साह्यासाठी मदत करणेत्यांना  सरकारच्या विविध योजना व सेवांची माहिती देणे व त्यांना त्या मिळउन देण्यासाठी त्यांना मदत करणे. शेतकऱ्यनि उत्पादित केकेला माल मधील दलाल साखळी कमी करून ग्राहकांपार्यात पोचविणे व त्या योगे शेतकर्यांना उत्पन्न वाढीस मदत करणे.
9)      सरकारी योजनद्वारे पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबविणे त्यायोगे बंधारेतलाव बांधणे.
10)  याशिवाय आणखी बराच काही समाविष्ट आहे यात परंतु वरील कार्य मुख्य असल्याने त्यांचा समावेश करतोय. बदलत्या गरजा  नुसार आमी उदिष्टांमध्ये पण बदल करतो.


बर्याच लोकांना वाटत यात यांचा काही फायदा असावापण त्यांना माझ एकच सांगणं आहेआमच रक्त मराठी  आहे जे आमला साद घालतंय खालेल्या मिठाला जागवतय  म्हणून आमी आता पुन्हा एकदा हा  स्वराज्याचा खेळ मांडलाय. अगदी एका वाक्यातसांगायच झाल तर,

ना राजकारणासाठी ना प्रसिद्धीसाठी जीव जळतो तो फक्त आपल्या माणसांसाठी’.

पुन्हा एकदा आवाहन करतो आपल्याला येण्याचसंघटना आपली वाट बघतेय आपल्या मदती शिवाय हे सर्व  शक्य नाही. आपण कुठल्याही जातीचे असा धर्माचे असा निसंकोच या.

भावनेच्या भरात काही चुकलं असेलकाही जास्त बोलून गेलो असेल तर माफी असावी.

जयौस्तु स्वराज्य,

जय महाराष्ट्र…………

आपला अध्यक्ष,
संतोष निकम,
आपल्या सारखाच भगव्या झेंड्याचा एक शिपाई.

स्वराज्य महिला संघ






नेहमीच अस म्हणलं जात कि जेव्हा जेव्हा गरज भासते तेवा मराठयांच्या बाईकामुली नेहमीच पुरषाच्या  खांद्याला खांदा  लाऊन लढताना दिसतात. राजमाता जिजाऊराणी ताराराणीराणी लक्ष्मीबाई यांपेक्षा अजून उदाहरणं मला यासाठी देता येणार नाहीतनक्कीच यांनी आपला काळ आपल्या  शौर्याने पराक्रमाने गाजवला आहे. अनेक मोठ्या पदावर सध्या मराठी महिला काम करत आहेत हे सर्व खरं आहे पण या सर्वात आम्ही सर्व सामान्य मुलीमहिला नक्की कुठ आहोतचूल आणि मुल या पलीकडच्या जगात आम्ही नक्की राहतोय का?व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे जे काय असतं ते खरया अर्थाने मिळतंय काया प्रश्ननांची  उत्तरे आपल्या पैकी काही जनी हो म्हणून देतील पण उरलेल्या बऱ्याच जनी नाही अस देतील पण यासाठी आम्ही काय करतोय का?कि पुरुषांसारखी आम्ही पण राजांचीजिजाऊची  वाट पाहतोयत्यांच्या सोबत लढलेल्या वीरांगनाचे,सह्याद्रीच्या छाव्याना जन्म दिलेल्या वाघीनींचे वंशज आपण  स्वराज्याच्या या रणसंग्रामात मागे काठरवल तर काय काय करू शकतो आपण! पण सुरवात कुणापासूनया सारखे खूप प्रश्न पडलेले होते पण उत्तर सापडत नव्हती आणि एक दिवस स्वराज्य  सेवा  संघाच्या कार्यक्रमात आध्याक्षांशी बोलणं झाल नि मिळाली उत्तर या सर्व पार्श्नांची. कळाली तळमळ मराठी मानसंसाठीची या संघटनेचीसमजली ताकद स्त्रीशक्तीचीमिळाला स्वाभिमान जगण्यचालढण्याचा. समजली दिशा विकासाची. संघटनेच्या या कामात आम्ही महिलाही कमी नाही हे पहिल्यांदाच समजल त्याची गरज हि समजली. मी आपणा सर्वाना आवाहन करते आपण हि या कार्यात आपल्याला जमेल तसं सहभागी व्हावं आणि स्वराज्य सेवेच्याविकासाच्या कामात आपलं योगदान द्यावं.

आता आम्ही महिलामुली काही कमी नाही आहोत हे सांगान्यचा काळ गेलाय आणि काही तरी करून  दाखवण्याची वेळ आलीये बघायचं एकंच अजूनही किती नारी शक्तीच रक्त सळसळतय  राणी लक्ष्मीबाईगत का थंड झालंय काळाच्या ओघात अन्यायाच्या अंधारात.

स्वराज्य महिला संघ आपली नेहमीच वाट पाहत आहे आपण याव सहभागी व्हावं आणि बनवी ताकद स्वराज्याची,संकोच नसावा कारण हे कार्य श्रींच आहे जनकल्याणाच आहे.

जय भवानी,
जय शिवाजी,
जयोस्तु स्वराज्य.

आपल्यासारखीच एक शिवअनुयायी
अश्विनी कदम
सचिवा
स्वराज्य सेवा संघ.

To Join us Please fill in this form,


मराठी लोकांची सद्य परीस्तीती पाहून संघटनेने आपली उद्दिष्टे ठरवली आहेत.   


1)      हिंदू-मुस्लीम-बौद्ध हे जे सर्व मतभेद आमच्यात आहेत ते मिटविण्यासाठी कार्य करणेकारण आता इथून पुढे एका दिव्यात एकाच वातमराठी आम्ही आमची मराठी जात
2)      खरा इतिहास लोकांपर्यंत पोचविणे.
3)      गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे.
4)      अनाथ आणि वृद्धाश्रम चालविणे.
5)      शिक्षण संस्था चालविणे.
6)      बेरोजगारी निर्मुलन (अल्पशिक्षित ते उच्चशिक्षित सर्वाना आम्ही नोकरी देतो).
7)      वृक्षपक्षीमृदा संधार्नासाठी वेग्वेग्ल्ये प्रकल्प राबविणे.
8)      शेतकर्याना आधुनिक शेतीची माहिती देणेवेगवेगळ्या कृषी विद्यापीठांशी सलग्न होऊन शेतकर्यांना  शेतीविषयक माहिती पुरविणेत्यांना शेती साठी अर्थ साह्यासाठी मदत करणे,त्यांना  सरकारच्या विविध योजना व सेवांची माहिती देणे व त्यांना त्या मिळउन देण्यासाठी त्यांना मदत करणे. शेतकऱ्यनि उत्पादित केकेला माल मधील दलाल साखळी कमी करून ग्राहकांपार्यात पोचविणे व त्या योगे शेतकर्यांना उत्पन्न वाढीस मदत करणे.
9)      सरकारी योजनद्वारे पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबविणे त्यायोगे बंधारेतलाव बांधणे.
10)  याशिवाय आणखी बराच काही समाविष्ट आहे यात परंतु वरील कार्य मुख्य असल्याने त्यांचा समावेश करतोय. बदलत्या गरजा  नुसार आमी उदिष्टांमध्ये पण बदल करतो.

                                                    




















                            








11

No comments:

Post a Comment